यावल (रिपोर्ट)
निवेदना नुसार अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगाव (कर्नाटक ) प्रांतातील छत्रपती शिवाजी राजे यांचा स्थापित केलेला पुतळा स्थानिक प्रशासनाने व सरकार ने कोणतीही पुर्वसुचना न देता मध्यरात्री हटवण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील व शिवप्रेमीनमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरी सदरील राजेंचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा. हि सर्व शिवसैनीकांची व शिवप्रेमींची इच्छा आहे. असे मागणीचे निवेदन शिवसेना यांनी तहसिलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले , शिवसेना आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तडवी , युवासेना शहर अधिकारी सागर देवांग , युवासेना तालुका सरचिटणिस सचिन कोळी, अल्पसंख्यांक तालुका संघटक अजहर खाटीक , युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे , युवासेना शहर सरचिटणीस विजय पंडित , शिवसेना विभाग प्रमुख योगेश पाटील, सुरेश कुंभार सह शिवसेना , युवासेना व आदिवासी सेल पदाधिकारी , कार्यकर्ते यांची स्वाक्षरी व उपस्थित होते.