अमळनेर(रिपोर्ट)
अमळनेर शहर तलाठी कार्यालयाची कार्यपद्धती व निर्णय प्रक्रियेच्या निषेधार्थ 20 ऑगस्ट 20 रोजी अमळनेर तहसील कार्यालयासमोर श्री एच टी माळी, माजी अप्पर जिल्हाधिकारी यांचे नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय नागरी हित दक्षता समिती अमळनेर या संघटनेने घेतला आहे
अमळनेर शहर तलाठी कार्यालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत नागरिकांशी कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही, त्यांना कार्यालयात चकरा मारायला भाग पाडले जाते, ज्येष्ठ नागरिकांची कामे होत नाहीत, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव दिसतो, कार्यालयात तलाठी उपस्थित नसले तर पत्राची पोच मिळत नाही, नागरिकांची पिळवणूक होते, मनस्ताप होतो. उदाहरणार्थ--- श्रीमती लता बाई पाटील व जिजाबाई पाटील यांचा गट क्रमांक 915 मधील प्लॉटचा सातबारा उतारा त्यांचे नावे मिळावा यासाठी कागदपत्रासह दोन वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केला होता. आज पर्यंत काम झाले नाही व कोणताही निर्णय अर्जदारास कळविला नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत.
वरील कार्यपद्धतीच्या निषेधार्थ आत्मक्लेश म्हणून उपोषण करण्याचे पत्र दिनांक पाच ऑगस्ट 20 रोजी मा तहसीलदार आंमळनेर ह्यांना प्रत्यक्ष भेटून गेले होते. पत्रावर नागरी हितदक्षता समितीचे अध्यक्ष प्रा अशोक पवार, सरचिटणीस बन्सीलाल भागवत, व संघर्ष समिती प्रमुख संदीप घोरपडे यांच्या सह्या आहेत.
नागरी हित दक्षता समिती अमळनेर ही नागरिकांना सर्व प्रकारच्या व्यक्तिगत व सार्वजनिक कामात मदत व प्रशिक्षित करणारी संघटना आहे. अमळनेर शहर तलाठी कार्यालय संबंधी काही तक्रारी असल्यास 20 ऑगस्ट 20 रोजी अमळनेर तहसील कार्यालयासमोरील लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन नागरी हित दक्षता समिती अमळनेर यांनी केले आहे उपोषणस्थळी येतांना प्रत्येकाने छत्री आणावी छत्रीचा काळा कापड निषेधासाठी, फिजिकल डिस्टंसिंग साठी
, व पाऊस आणि उन्हापासून बचावासाठी छत्रीचा उपयोग होईल.

