पातोंड(रिपोर्ट राकेश पाटील)

अमळनेर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पातोंडा परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली असून विहिरींच्या जलपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. खरीपाची पीक शिवारात बहरलेले आणि वाऱ्यावर डोलताना दिसून येत आहेत 
मागच्या अनेक वर्षांपासून गावविकासाचे व्हिजन ठेवून  पातोंडा परिसरात पातोंडा परिसर विकास मंच मार्फत कपिल पवार(मुख्य वित्त लेखा अधिकारी,जळगाव मनपा),मगन सूर्यवंशी,कण्हेयालाल थोरात,पी.एल.संदानशिव,रावसाहेब बोरसे,विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विकास मंच च्या मावळ्यांच्या सहकार्याने नालाखोलीकरण करण्यात येत आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात भाजप सरकारने प्रभावी पणे राबविलेली जलयुक्त शिवार योजनेतून नालाखोलीकरण करण्यात आले आहे ज्यात ट्रेच-कम-रिचार्ज शॉप मधून भूगर्भात १२ बोअरवेल करण्यात आले,विहीर पुनर्भरण करण्यात आले.ज्याच्या उद्देश भूजल पातळी उंचावणे आणि भूजल पुनर्भरण हा होता शिवाय गॅबियन बंधारा बांधण्यात आला.ज्यामध्ये सा.कार्यकर्ते घनश्याम पाटील,राकेश पाटील यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.शिवाय पाणी फाउंडेशन टीम ज्यात सागर मोरे,नितीन पारधी,शीतल पालखे,चंद्रकांत लोहारे,मुरलीधर बिरारी, गोकुळ बिरारी,जितू पाटील,पद्माकर वाघ यांनी उत्कृष्ठ कार्य केले ज्यात शेततळे,कळणी नाला खोलीकरण करण्यात आले त्याच्या प्रत्यक्ष फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतर्फे कौतुक होत असून शास्वत विकासासाठी निरंतरपणे कार्यरत असणाऱ्या चळवळी, संस्था आणि व्यक्ती यांची समाजाला गरज आहे.आजच्या काळात गावखेड्यात वैविध्यपूर्ण उपक्रमातून शेततळी,नालाखोलीकरण, ट्रेच कम रिचार्ज शॉप प्रकल्प,गॅबियन बंधारा,विहीर पुनर्भरण यासारख्या कामातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होत आहे.अश्या कामांचे मूल्य करता येणार नाही एकीकडे मोठमोठी धरणे बांधताना केंद्रीकरण प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पाण्याचे विकेंद्रीकरण साठी या योजना,प्रकल्प,चळवळी वाढल्या पाहिजेत.


पातोंडा परिसर विकास मंच, जलयुक्त शिवार योजना,तसेच पाणी फाउंडेशन टीमने एक मोठे कार्य उभारले आहे.ज्याच्या प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना झाला असून विहिरींच्या जलपातळींत वाढ झाली आहे.तसेच भूगर्भातील भूजल उंचावले आहे.त्यामुळे प्रामाणिकपणे गावविकास व्हिजन ठेवून निरंतरपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था,चळवळी,यांचे कौतुक वाटते आणि त्या बहरल्या पाहिजेत जेणेकरून गावखेड्यांचे रूप पालटून भविष्यात शास्वत कार्य उभे राहील.आणि पाणी साठ्यात वाढ होत राहील.शिवाय सरकारच्या अश्या योजना निरंतर पणे सुरू राहिल्या पाहिजेत ज्यातून गावखेड्यातील व्यक्ती,संस्था,चळवळींना नेहमी उत्तेजन मिळेल आणि पाणी प्रश्नावर व्यापक कार्य उभे राहिल.
आनंद कुंभार;शेतकरी