दोंडाईचा(रिपोर्ट-भरत कोळी)

दि.13.8.2020 वार गुरुवार सकाळी 9 च्या सुमारास झोतवाडे  ता. शिंदखेडा जि. धुळे येथे 20 वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपक चतुर शिरसाठ असे त्या मुलाचे नाव होते. दिपक हा एस.वाय.बी.ए. चे शिक्षण घेत होता.
आई-वडील मजुरी कामासाठी गेले होते व दिपकचा मोठा भाऊ दोंडाईचा येथे कामानिमित्त गेले होते. गळफास घेण्याचा आद्यप कोणताही उलगडा झाला नसून
दोंडाईचा पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू ची नोद करण्यात आली आहे.पुढील तपास पो.ह.विजय मोरे करीत
आहे.