नंदुरबार(रिपोर्ट)
नंदुरबार पंचायत समितीची सभा नाट्यमयरित्या येथील पंचायत समितीच्या स्व.हेमलताताई वळवी सभागृहात सभापती प्रकाश गावीत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेची वेळ बारा वाजेची असताना सभा तब्बल पंचेचाळीस मिनिटे उलटूनही सुरू नझाल्याने  विरोधी पक्षाच्या सभासदांनी वेळेवर सभा सुरू न झाल्याने सभगृहातून बाहेर पडून पंचायत समिती सभापती तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी हे मनमानी कारभार करीत असून आम्ही सभात्याग करीत असल्याबाबतचा रोष  करीत सभासदांनी सभगृहाबाहेर जाणे पसंत केले तर सभा सुरू करण्यासाठी सभेचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती प्रकाश गावित यांच्या आदेशान्वये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सभात्याग केलेल्या सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांना विनंती करीत पंचायत समितीच्या मासिक सभेत आमंत्रित केले तर विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सभापती हे मनमानी कारभार करीत असल्या बाबतच्या असंतोष व्यक्त करीत सभात्याग केला होता परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती सभापतींनी विनंती केल्यावर सभात्याग केलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना पुन्हा सभेत पाचारण केले व नाट्य नाट्यमयरित्या झालेली सभा एक वाजता सुरू झाली या सभेत विषयांवर चर्चा करण्यात येऊन या सभेच्या   सुरुवातीस सर्व विभाग निहाय कामकाज यांचा आढावा पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांनी घेतला यावेळी आढावा संपल्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यांनी पंचायत समिती बद्दल विविध विभागांमार्फत चालविलेल्या मनमानी कारभार तसेच एकतर्फी निर्णय यासंदर्भातला स्पष्ट आरोप पंचायत समितीचे सदस्य धर्मेंद्रसिंह परदेशी यांनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायती मधुन बेकायदेशीररित्या सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांमार्फत प्रत्येकी दहा हजार रुपये बेकायदेशीररित्या जमा करण्याचे आदेश दिले तरी कोणी?या संदर्भातली गंभीर तक्रार पंचायत समितीच्या मासिक सभेत केली तर पंचायत समितीचे सदस्य कमलेश मराठे यांनी अंगणवाडी अंतर्गत वाटप केला जाणारा पोषण आहार अमृत आहार योजनेबद्दल या ठिकाणी गंभीर तक्रार करीत पंचायत समितीच्या अंगणवाडीतील मुख्य सेविका या अंगणवाडी सेविका पोषण आहार वाटप संदर्भातल्या काही रक्कम वसूल करून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाने घेतली बाबतचे गंभीर तक्रार यावेळी पंचायत समिती सदस्य कमलेश मराठे यांनी केली तर येथील पंचायत समिती सदस्य यांनी गावात सर्व लाईट हे बंद असल्याची गंभीर तक्रार यावेळी पंचायत समिती सदस्य यांनी यावेळी तक्रार केली तसेच पंचायत समितीच्या कामकाजाचा विभाग निहाय आढावा सर्व सदस्यांनी घेतला व विभाग निहाय सर्व विभाग प्रमुखांनी पंचायत समितीच्या विविध कामांचा आढावा पंचायत समितीच्या सभेत या ठिकाणी सादर केला यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांच्या समवेत पंचायत समिती उपसभापती लताबाई पाटील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक पटाईत सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी यांच्यासह सर्व पंचायत समितीचे विभाग प्रमुख सामाजिक वनीकरण विद्युत विभाग अधिकारी तसेच सर्व पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.