अमळनेर (रिपोर्ट)
तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासन दरबारी याबाबत प्रश्न लाऊन धरला होता त्याला अजित दादा पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी चर्चा करून सतत उपेक्षित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापसाचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा लाभला आहे. कापूस पीकविमा मंजूर झाल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथून दिली आहे.
जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता सतत चार वर्षे दुष्काळ असूनही कधी विमा मिळाला मिळाला नाही अशी स्थिती असतांना आमदार झाल्यानंतर अनिल पाटील थेट बांधावर गेले महसूल कृषी अधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन शेत ते शेत जाऊन थेट पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तातडीने शासन दरबारी पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. व यासाठी शासन दरबारी याबाबत चर्चा केली व पाठपुरावा सुरू ठेवला होता.
सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना मानगुटीवर बसल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला होता.मात्र सतत दरफेरीला आमदार अनिल पाटील यांचा पाठपुरावा सतत करत होते.
तालुक्यातील पिकांची कापसाची नुकसानभरपाई कापूस विमा याबाबत शेतकऱ्यांसाठी सदैव झटणारे शेतकरी व काँग्रेस मित्रपक्ष नेते प्रा सुभाष पाटील यांनी आमदार पाटील यांच्याशी सारखा तगादा लावला होता. आमदार अनिल पाटील देखील सातत्याने पाठपुरावा करत होते. शेतकरी वर्ग नुकसान होऊनही पीकविमा मिळत नाही याबाबत आमदार पाटील यांना तगादा लावत होते. मात्र कोरोना परिस्थिती लॉकडाऊन या काळात प्रशासन व शासन यांचे लक्ष कोरोनाकडे असतांना वेळ जात होता अखेर आमदार पाटील यांनी अजित दादा पवार व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करून चर्चा करून याबाबत आग्रह धरला होता अमळनेर तालुक्यातील सतत अवर्षण गेल्या वर्षी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी आग्रही मागणी जोरदारपणे लावून धरली होती.
असा मिळणार विमा
तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुलै 2019 मध्ये हेक्टरी 1800 रुपये भरले होते तालुक्यातील 25 हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 ते 23 हजार रु प्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८ मंडळात
शिरूड, वावडे, भरवस, मारवड, अमळगाव, पातोंडा, नगाव, अमळनेर,,आठही मंडळातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.,
या साठी सर्व शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका कृषी अधिकारी भरत वारे , पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचे
आभार व्यक्त केले आहेत.

