मारवड:अमळनेर तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे म्हणून प्रशासन सोसियल डिस्टनिंग न पाळणाऱ्या वयक्तींवर लक्ष ठेवून आहे तरीही सरकारी आदेशाला न जुमानता शेतात पत्यांचा डाव मांडणाऱ्या काही जुगाऱ्यांना मारवड पोलिसांनी आपला हिसका दाखविला.
   ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क,सोसियल डिस्टनिंग पाळणे बंधनकारक आहे असे असता मारवड पोस्टेशन च्या हद्दीत देविदास पाटील हे जुप या पद्ध्तीने करीत असलेल्या शेतात गजानन पवार,राजेंद्र भदाणे,वासुदेव बडगुजर,घनश्याम बडगुजर,वासुदेव मारवडकर,शब्बीर खाटीक,अनिल पाटील,बाळासाहेब साळुंखे व पंकज लोहार असे कोरोना साथ रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असताना,मास्क,रुमाल किंवा कपडा वैगरे बांधणे अत्यावश्यक असतांना व विनाकारण न फिरण्याचे आदेश असतानाही शेतात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळतांना मिळून आले त्यांच्याकडून जुगार साहित्य व रुपये 28,784 इतकी रक्कम जप्त करण्यात आली  आंहे.
 पुढील तपास मारवड बिटचे सहाय्यक फौजदार शिंदे व मुकेश साळुंखे हे करीत आहेत.अमळनेर बीडीओ व मारवड पोलीस यांना माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली.