अमळनेर-धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून सोडलेल्या आवर्तनाचे पाणी सोमवारी अमळनेर तालुक्याच्या हद्दीत ब्राह्मणे गावाच्या पुढे पोहचले असून त्या पाण्याचे आज सोमवार दिनांक 11 मे रोजी सायंकाळी जलपुजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करून साडी चोळी नारळ नदीला अर्पण करण्यात आली.
त्यावेळी गौरव पाटील, गुणवंत पाटील, प्रदीप सूर्यवंशी, भानुदास पाटील, जितेंद्र पाटील, तुषार पाटील, उदय पाटील, विजय जैन, नाना पाटील, विजू आणा, सरपंच काशिनाथ महाजन, आप्पा महाजन, सुरेश पवार, गजू महाराज, किशोर पाटील, प्रणव पाटील,भरत पाटील, प्रमोद पाटील, दगडू सोनवणे, पंढरीनाथ पाटील, उदय शिंदे, प्रविण ओंकार पाटील सरपंच बाह्मणे, अशोक पाटील सरपंच भरवस, राजेंद्र पाटील भरवस, भैय्या साहेब पाटील, राजेंद्र वानखेडे, भैय्या सर, अनिल पाटील, वसंत भिल, किशोर पाटील, कौतिक पाटील, दिलीप देशमुख, प्रणव सुर्यवंशी व परिसरातील सरपंच व मुडी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.सदर आवर्तनामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटणार असून या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले आहेत.