अमळनेर-जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे कोरोनाचा हॉटस्पॉट निर्माण झाल्याने जनता भयभीत झालेली असताना मुळीच घाबरू नका?कारण आ.अनिल पाटील यांनी बैठकीत केलेल्या आवाहनानुसार अमळनेरात कोरोनाचे कितीही मोठे संकट आले तरी हे चॅलेंज आम्ही स्वीकारल्याची ग्वाही अमळनेर येथील तज्ञ डॉक्टरांनी दिली असून स्थानिक रुग्णांचा उपचार स्थानिक पातळीवरच करण्याची दाखविल्याने अमळनेरकराना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमळनेर शहरात एकापाठोपाठ 23 कोरोना बाधित रुग्ण आढळून त्यातील सहा रुग्ण दगवल्याने रुग्ण आढळलेल्या शहराचा मोठा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सील करण्यात आला आहे,अश्या परिस्थितीत जनता भयभीत झालेली असल्याने पुढील उपाययोजना म्हणून आ पाटील यांनी अमळनेर येथील तज्ञ डॉक्टरांची तातडीची बैठक त्यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती,या बैठकीस प्रसिद्ध सर्जन डॉ अनिल शिंदे,डॉ अविनाश जोशी,आय एम ए चे अध्यक्ष डॉ नितीन पाटील,डॉ निखिल बहुगुणे,डॉ शरद बाविस्कर,डॉ संदीप जोशी,डॉ किरण बडगुजर,डॉ प्रशांत शिंदे,तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे व डॉ जि एम पाटील उपस्थित होते.यावेळी आमदारांनी शहराची बिकट परिस्थिती विशद करत ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय काय करता येईल यावर उपाययोजना सुचविण्याची विनंती केली.यावर डॉक्टरांनी शहरात हॉस्पिटलची कमतरता असल्याने कोणत्याही संशयितास लक्षणे नसल्यास त्याच्या घरीच क्वांरटाईन केले जावे असा सल्ला सर्व डॉक्टरांनी दिला व डॉक्टरांनी संशयित रुग्ण तपासताना संपूर्ण पीपीई किट घातलेले असेल तर त्यांना मुळीच क्वांरटाईन करण्याची आवश्यकता नाही हा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.जिल्ह्यात चोपडा व मुक्ताईनगर येथे कोविड हॉस्पिटल झाले आहे अमळनेर मध्ये ते नसले तरी येथील प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऍडमिट करण्यासह उपचार करण्यासाठी डॉक्टर मंडळी सक्षम व सज्ज असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनी दिली व संशयित रुग्ण गंभीर असेल तरच त्याला जळगाव अथवा धुळे पाठवावे लक्षणे नसलेल्या सामान्य रुग्णावर स्थानिक पातळीवरच उपचार करावेत त्यासाठी सर्व डॉक्टर मंडळी मदतीसाठी तत्पर राहतील अशी ग्वाही डॉक्टरांच्या वतीने देण्यात आली व अमळनेर येथील गंभीर रुग्णास जळगाव न पाठविता अंतराचा विचार करता धुळे येथेच पाठविण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती देखील डॉक्टरांनी केली.यावेळी ग्रामिण रुग्णालयात एक्सरे मशीन खरेदी करण्याची मागणी डॉक्टरांनी केंल्याने आमदारांनी याची नोंद घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या,रुग्ण संख्या वाढल्यास शहरातील खाजगी लॅब मध्येही टेस्टिंग करण्याची वेळ आली तर ती ठेवावी याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.व बाहेरगावी सरकारी रुग्णालयामध्ये केले जात असतील त्यापेक्षा अधिक चांगले उपचार आम्ही खाजगी रुग्णालयात करू अशी ग्वाही डॉक्टरांनी दिल्याने आ पाटील यांनी जनतेच्या वतीने सर्वांचे आभार मानत त्यांनी केलक्या प्रत्येक सूचनांची नोंद घेतली.व आज खऱ्या अर्थाने या भूमीचे पांग आपण फेडत आहात असेही आवर्जून सांगितले.
डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवाल तरच कोरोनाशी लढत
डॉक्टरांनी यावेळी दरम्यानच्या काळात आलेले काही वाईट अनुभव व्यक्त केल्याने आमदारांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या.व जनतेस आवाहन करताना ते म्हणाले की सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टर्स व तेथील आरोग्य कर्मचारी या भयावह स्थितीत अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत,मात्र काही जण त्यांच्यापासूनच वेगळ्या पद्धतीने सोशल डिस्टनसिंग ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांचे मनोबल घटवीत आहेत,तर यापुढे असे प्रकार न करता उलट त्यांचे मनोबल वाढवावे,कारण ते तयार असतील तरच खऱ्याअर्थाने कोरोनाशी लढत आपण देऊ शकू यासाठी शहरासह गावोगावी त्यांचे स्वागत झाले पाहिजे,त्यांच्याबाबतीत नेहमीच कौतुक केले पाहिजे,त्यांचे कर्तव्य ते मोठ्या हिमतीने बजावत असून आपण केवळ घरात थांबणे,स्वच्छता ठेवणे आणि मास्क वापरणे एवढी काळजी घेतली पाहिजे,बाहेर गावाहून कोणीही आले असल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी,जेणेकरून त्या नागरिकास घरीच क्वांरटाईन करून फैलाव रोखता येईल,जनतेमध्ये या परिस्थितीततही सकारात्मकता निर्माण होणे गरजेचे असून याही परिस्थितीत सर्वच दवाखाने आपल्यासाठी उघडे असल्याने मुळीच घाबरू नका मात्र डॉक्टर आणि प्रशासनास सहकार्य व प्रोत्साहन नक्की द्या असे आवाहन आमदारांनी केले आहे.