अमळनेर: विधान परिषद आमदार सौ स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर कृ उ बा सभापती प्रफुल्ल पवार व प स सदस्या कविता प्रफुल पवार यांनी गावोगावी कोरोना रोगाबाबत फवारणी व जनजागृती मोहीम राबविली.
   या मोहिमेअंतर्गत पवार दाम्पत्यांनी धार,मालपूर, मारवाड,गोवर्धन व बोहरा ही गावे निर्जंतुकीकरण करून फवारणी करून कोरोनाविषयी जनजागृती केली आहे त्यांच्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.या मोहिमेत त्यांच्या सोबत ग्रामसेवक वासू पाटील,विंचूरकर तसेच अनेक ग्रामस्थ होते.