अमळनेर:लॉक डाउन च्या काळात लोकांना घर वापसीची परवानगी जरी मिळाली असली तरी बाहेरून येनाऱ्या लोकांना योग्य स्थळी कोरोंटाइन न केल्यास कोरोना फैलावू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे.
  अमळनेर तालुक्यातील मांडळ अंतर्गत 6 उपकेंद्र आहेत.या भागात बाहेर गावाहून आलेल्या एकूण 2968 लोकांच्या हातावर कोरोना विषयी शिक्के मारून त्यांना त्यांच्याच घरात कोरोंटाइन करण्यात आले.ग्रामीण भागात या मुळे अडचणी येत आहेत.लहान घर व मोठे कुटुंब यामुळे या लोकांना गावातील शाळेत कोरोंटाइन केले पाहिजे होते असे जाणकारांचे मत आहे.