अमळनेरकर जनतेने थोडा संयम ठेवावा टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू होतील मात्र शहर मोकळे झाले म्हणजे सर्व सुरू झाले असा होत नाही त्यासाठी प्रशासकीय ऑर्डरी निघतात त्यान निघाल्याशिवाय जास्त घाई करू नका असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे सध्या फक्त ठराविक दुकाने सुरू करण्यात आलेली आहे आज मात्र सर्वच व्यापारी आपले व्यवसाय सुरू करून दुकाने उघडी होती मात्र खाद्यपदार्थ व इतर दुकाने हळूहळू सुरू होतील फक्त अत्यावशक यासह दुरुस्ती साहित्य आदी व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत याबाबत नागरिकांनी सतत संयम ठेवावा असे आवाहन आमदार पाटील यांनी शनिवारी सायंकाळी केले 
गाव सुरू होणे हे काम टप्प्याटप्प्याने सुरू होते या सर्व जनतेच्या व व्यावसायिकांच्या हिताच्या दृष्टीने असून आपण काही व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करता कामा नये गेल्या दोन महिन्यांपासून सर्व व्यवसाय ठप्प होते याची सर्वांना काळजी आहे सोशल डिस्टन्स यासह विविध भागात गर्दी होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनी सजग राहावे प्रत्येक व्यावसायिकाने तोंडाला मास्क व सॅनिटायझर जवळ ठेवावे जेणेकरून जनतेचे व स्वतःचे रक्षण होईल जनतेने देखील तोंडाला मास्क सोशल डिस्टन्स पाळणे जरुरीचे आहे इतर व्यवसाय हातगाड्या टप्प्याटप्प्याने आदेश काढून सुरू करण्यात येतील प्रांताधिकारी व तहसीलदार हे याबाबत आदेश करतील तेव्हाच आपण व्यवसाय सुरू करावेत काही व्यवसाय आत्ताच सुरू करणे म्हणजे शहरात गर्दी वाढवणे असा होतो त्यासाठी आदेश निघेपर्यंत जनतेने संयम बाळगावा गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय बंद होते पुन्हा लॉक डाउन करण्याची पाळी येऊ नये यासाठी धीर धरावा.