अमळनेर: ग्रामपातळीवर कोरोना बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत झेड पी चे सि ओ डॉ. बी. एन.पाटील यांनी सर्व बी. डी. ओ.यांना लेखी सूचना देऊन अहवाल मागितला आहे.
गावात भरणारा भाजीपाला बाजार,किरकोळ बाजार व फेरीवाले यांना वेळ नेमून देऊन सोसियल डिस्टनिंग चे महत्व बी डी ओ यांनी पटऊन द्यावे व गावातील किराणा दुकान व इतर अत्यावश्यक सुविधा पुरवीत असतांना खुणा आखणे हे नियम पाडले जावेत.
तसेच गावात गर्दी करून कोणी गावात,सार्वजनिक ठिकाणी व पारावर गप्पा मारतांना आढळल्यास पहिल्या वेळेस समज देऊन सोडावे व नंतर 500रु दंड आकारण्यात यावा तसेच कोणीं बिना मास्क गावात फिरल्यास 500 रु दंड आकारण्यात येईल व या सर्व सूचना दवंडी पिटवुन कळविण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत.