कोरोना विषाणूचा संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन आपला वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात झालेल्या ग्रामीण भागातुन नागरिकांचे आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून सोशल डिस्टनसिंग पाळून कोरोना या आजाराविषयी जनजागृती करत
डॉ.जितेंद्र एस.पाटिल व डॉ.स्नेहल पाटिल यांनी सेवा होमियोपॅथी क्लिनिक तर्फे मोफत होमियोपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले,  त्यात अंमळनेर तालुक्यांतील ग्रामिण भागांत कोरोना आजारांवर जनजागृती करत जवखेडा,आनोरे, व आर्डी तिन्ही गावात जाऊन कोरोना बाबत जनजागृती व सोशल डिस्टनसिंगचे महत्त्व पटवून देत जवखेडा येथे  ५२००,आनोरे गावात ७०० तसेच आर्डी गावात १५०० लोकांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हिमियोपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले त्यासोबत अमळनेर शहरात देखील जवळ पास ७००० लोकांना भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने दिलेल्या गाईड लाईन नुसार शरिराची रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढविण्याच्या होमियोपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले असून अजूनही वाटप सुरू आहे तरि या कामात त्यांना श्रीनिवास मोरे,विजय पाटील,नितीन पाटिल, राहुल पाटिल ,कुणाल पाटील, अड डी वाय पाटील,गीतेश पाटील,जगतराव पाटील  आणि आशा सेविका व तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले