अमळनेर- दि.६ मे २०२० रोजी झाडी येथे संध्याकाळी दोन तळीरामांनी दारूच्या नशेत मोटरसायकल वरती आले आम्ही पोलीस आहेत असे लोकांना धाक दाखवून महिला व पुरुषांना अश्लील शिवीगाळ करून चक्क वयोवृद्ध म्हाताऱ्यांन कडून हातातली काठी घेऊन दोन ते तीन वयोवृद्धांना त्याच काठीने डमी पोलिसांनी काठीने मारहाण केल्याची धक्कादायक झाडी येथे घटना घडली आहे.
गावातील काही लोकांनी त्यांना विचारना केली की तुमचे आयकार्ड दाखवा नाहीतर मारवाड पोलीस स्टेशनला फोन लावून शहानिशा करा तुम्ही पोलीस आहेत का?असे गावकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांची बोलती बंद झाली आणि गावातील लोकांनी सोशलडिस्टनिग चा भान ठेवून गर्दी न होऊदेता भरवस येथील अज्ञात दोघे तळीरामांना भन्नाट चांगलाच चोप दिला, भरवस येथील दोघे तळीरामांनी तेथून पळ काढून निघून गेले.
अज्ञात भरवस येथील बेवडे हे शासकीय कर्मचारी असल्याचे बोलले जात आहे, अशा या घटने मुळे मारवड पोलिसांत अज्ञात तळीराम विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची जनते मध्ये चर्चा जोर धरत आहे.