सुरत:अखिल भारतीय वारकर मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य श्री प्रकाश महाराज बोधले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुजरात राज्यातील भागावताचार्य सौ.ह भ प संध्याताई महाराज माळी(सुरतकर) आणि श्री.ह भ प आनंदराव महाराज पाटील(कान्हेरेकर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, इतर पदाधिकारी,समस्त वारकरी परिवार, राजकीय व सामाजिक श्रेत्रातील मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या 2 वर्षे पासून गुजरात राज्यात भागावताचार्य सौ.ह भ प संध्याताई महाराज माळी ह्या राज्य महिलासमिती प्रदेक्षाध्यपदी कार्यरत आहेत आणि भागवत कथा ,कीर्तने या माध्यमातून समाजकार्य व समाज जागृती करीत आहेत तर गुजरात राज्यातील सुरत जिल्हाधक्ष श्री.ह भ प आनंदराव महाराज पाटील यांनी देखील अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कार्य उत्तम तर्हेने सुरू ठेवून सुरत शहरात अनेक भागात भागवतकथा व श्री.अखंड हरीनाम सप्ताहास सुरवात करत उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य त्यांच्यात आहे.या कार्याची दखल घेत भागावताचार्य सौ.ह भ प संध्याताई महाराज माळी(सुरतकर)व श्री.ह भ प आनंदराव महाराज पाटील(कान्हेरेकर) यांची नियुक्ती झाली आहे.