पारोळा:अमळनेर बस डेपो तर्फे पारोळा बस स्थानकातून पायी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
   लॉकडाउन मुळे आपल्या राज्यात घराकडे जाणाऱ्या मजुरांची स्थिती दयनीय असून 22 मजूर जमले की बस सोडण्यात येते. याअगोदर मजुरांची पारोळा कुटीर रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाते मगच एकूण 22 प्रवासी जमल्यास(सोसियल डिस्टनिंग राखत)त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले जाते, एम पी च्या मजुरांना मुक्ताईनगर च्या खडक्या पर्यंत पोहचविले जाते तर झारखंड येथील मजुरांना नागपूर पर्यंत
   अश्या दिवसातून 4/5 फेऱ्या सोडल्या जातात अशी माहिती पारोळा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रण अमळनेर आगारचे सोनवणे यांनी दिली आहे.