अमळनेर: देशातील संकटमय स्थिती पाहता त्यात शेतकरी संकटात आहे म्हणून अमळनेर तालुक्यातील सुमारे 30000 शेतकऱ्यांनी आपली कर्जे व बँक खाती जमा करून घ्यावे म्हणून प्रांतअधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले .या प्रसंगी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोकुळ बोरसे,जळगाव जिल्हा कॉग्रेस कमिटीचे चिटणीस प्रो. सुभाष पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन पाटील,कामगार नेते रामभाऊ संदानशिव, सुरेशदादा पाटील आणि विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन त्यात रामलाल वनजी पाटील(शिरसाळे),उत्तम पितांबर पाटील(सडावन),जिजाबराव चुडामन पाटील (सडावन),संजय पुनाजी पाटील,अरुण बाबुराव देशमुख(खवशी),निंबा गंगाराम पाटील,रोहिदास बंडू कापडे(खव शी),उत्तम पीतांबर पाटील,कैलास मुरलीधर पाटील, अनंता निकम हे उपस्थित होते.