पारोळा: पारोळा तालुक्यातील गणपती मुंदाने हे गाव कोरोना या साथीच्या आजाराबाबत सजग असल्याचे दिसून येत आहे.15 दिवसात गावात दुसऱ्यांदा धूर फवारणी करण्यात येऊन गावात सॅनिटाइझर चे वाटप करण्यात आले.हे सर्व नियोजन एकनाथ पाटील (दादा पोलीस) यांच्या स्वखर्चाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या प्रसंगी सरपंच, उपसरपंच बाळू पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.