अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे भूमिपुत्र शेतकरी गटाचा 660 बॅग युरिया डांगरी येथे पोहोच झाला आहे. त्याचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते डांगरी येथे करण्यात आला. 

कोरोनामुळे गर्दी नसावी म्हणून घरपोच सेवा - शेतकऱ्यांपर्यंत खते बियाणे पोहचावे कोरोनामुळे दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी 
कृषी विभागाने नियोजन शेतकऱ्यांपर्यंत खत बांधावर खत पोहोचले आहे.डांगरी येथील 15 शेतकऱ्यांचा गट तयार केला असून त्यांनी विक्रेत्यांकडून युरिया हे खत 600 बॅगा नोंदणी केली. त्यानुसार 30 टन युरिया डांगरी गावी पोहचला. 
कृषी हंगामातील खरीप पिकांची लागवड आणि वितरण कोरोना असल्याने शेतकऱ्यांपर्यंत विविध पिकांचे, बियाणे खते पोहचवता यावे यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. त्यावर येणाऱ्या समस्यांवर आमदार अनिल पाटील यांनी मार्ग काढून कृषी विभाग आणि विक्रेते यांची बैठक घेतली होती. त्यात ही संकल्पना राबविण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे शेतकरी आपला गट तयार करीत असून बांधावर बियाणे व खत ही संकल्पना राबविण्यात आली आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी मिळून असे गट तयार करावे.जेणेकरून गर्दी आणि जास्त दराने विक्री यासह कृत्रिम टंचाई भासणार नाही. 
यावेळी आमदार अनिल पाटील, डांगरी येथील सरपंच अनिल सिसोदे, माजी सरपंच चिंधु पाटील, माजी सरपंच लोटन पाटील तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी अधिकारी वाय ए बोरसे, मंडळ कृषी अधिकारी पी व्ही निकम, कृषी सहाय्यक एन जी पवार, अजय पवार, खते विक्रेते प्रदीप महाजन आदी उपस्थित होते.