धुळे दि.25 मे शिंदखेडा (रिपोर्ट) रविंद्र शिरसाठ:- 

धुळे शहरात सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लॉक डाऊन झाल्याने शहरातील हजारो परिवार उध्वस्त झाले आहे.व अनेकांची उपासमार सुरू झाली आहे.तसेच धुळे शहरात संचारबंदी व लॉक डाऊन घोषीत झाल्या त्या दिवसांपासून "आदिवासी वाल्मिकलव्य सेना" आणी धुळे शहर अॅन्टी करोना टास्क फोर्स धुळे जिल्हा तर्फे मोलमजूरी करणाऱ्या परिवारांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा किराना सामानाचे वाटप करण्यात आले, संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा वाटप सुरूच आहे.तसेच आज दि.२४ मे रोजी देखील पाच गरजू परिवारांना अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या धुळे जिल्हा समन्वयक तसेच आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ.कविताताई कोळी तसेच टास्क फोर्सच्या धुळे जिल्हा सल्लागार सौ.मिनाक्षीताई सोनार यांच्या हस्ते किराना सामानचे वितरण करण्यात आले.यावेळी धुळे शहरातील शनीमंदीर गोंदूर रोड परिसरातील विधवा,परितक्ता,वृध्द दापंत्य,अपंग व विवीध मोलमजूरी करणाऱ्या पाच परिवारांना किराना सामान घरपोच देण्यात आले.याप्रसंगी अॅन्टी करोना टास्क फोर्सचे धुळे जिल्हा सह समन्वयक जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.कपील सोनार,तसेच सामाजिक कार्यकर्ता धनंजय गाळणकर याप्रसंगी उपस्थित होते.तसेच करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेली संचारबंदी व लॉक डाऊन संपेपर्यंत अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या वतिने गरजूंना सर्व तऱ्हेची मदत घरपोच तसेच ऑन दी स्पॉट मदत पोहचवली जाईल.असे आदिवासी वाल्मिकलव्य सेनाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.कविताताई कोळी यांनी प्रसार माध्यमांना माहीती दिली.