अमळनेर: शासनाचे कुठलेही निर्देश नसतांना कटती च्या नावाखाली क्वीनटल मागे 350 ते 400 रु कापले जात आहे .ही शेतकऱ्यांची कथित आर्थिक लूट असून ती थांबावी अशी मागणी पत्राद्वारे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.
 कापूस फेडरेशन मार्फत अमळनेर येथील लामा जिनिंग मध्ये कापूस खरेदी सुरू  आहे पण शासनाचे कुठलेही निर्देश नसतांना कटती च्या नावाखाली क्विंटल मागे 350 ते 400 रुपये कापले जात असुन ही लूट कोणाच्या संगनमताने सुरू आहे असा सवाल माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे.
    तसेच नोंदणी टोकन प्रक्रियेबाबत त्यांनी चौकशी ची मागणी करून तसेच यापुढे प्रशासनाने शेतकरी यांचे घरी जाऊन टोकन द्यावे व अशा शेतकऱ्याचे नाव कृ उ बाजर समिती,तहसील कार्यालय व ग्राम पंचायतीच्या फलकावर लावण्यात यावी अशी प्रशासनाकडे लेखी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे.