अमळनेर(रिपोर्ट)
येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेचे 12 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर संजय गांधी 147 श्रावणबाळ 387 व इंदिरा गांधी 91 अशा योजनांचे 625 प्रकरणे मंजूर करण्यात आली.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी गोरगरिबांना आधार देणारा हा विषय असल्याने अपघाती अथवा नैसर्गिकरित्या कुटुंबप्रमुख मृत झालेल्या लाभार्थी असलेल्याना आधार मिळावा हाच आपला प्रामाणिक हेतू असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ व इतर उपस्थित होते. 
राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेत कुटुंबप्रमुख मृत झालेल्या 12 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 2 लाख 40 हजारांची रक्कमेचे धनादेश वितरण झाले. त्यात शालुबाई गोविंदा वानखेडे लताबाई अर्जुन धनगर सुरेखा नाना शेटे, सर्व अमळनेर तुळसाबाई साहेबराव महाले जुनोने, मनीषा बापू पारधी जानवे, शांताबाई जंगलु भील बोरगाव मायाबाई मंगा भिल बोरगाव, मंगलबाई सुक्राम भिल पळासदळे, प्रमिला अशोक चौधरी अमळनेर, आशाबाई अनिल मस्के पिंपळे, भुराबाई अशोक साळुंखे अमळनेर, साधना चंद्रकांत गीते अमळनेर या सर्व लाभार्थ्यांना हे धनादेश वितरण झाले.