पारोळा-अमळनेर पारोळा रस्त्यावर भिलाली फाटा जवळ लावलेले ब्यारॅकेट हे लोखंडी असून त्यांना कोणतेही सावधनतेचे रेडियम अथवा स्टिकर लावलेले नाही त्यामुळे हे धोकादायक ठरू शकतात.काही दिवसांपूर्वी चाळीसगांव हुन अमळनेरला बंदोबस्त साठी येणारा पोलीस कर्मचारी लावलेल्या त्या ब्यारॅकेटला रेडियम नसल्यामुळे धोडक्यात बचावला.असे लहान व किरकोळ स्वरूपाचे अपघात होतच राहतात तरी पोलीस विभागाने निदान या बॅरिकेट्सवर सावधानतेचा निशाण वा रेडियम लावावे जेणेकरून वाहनधारक सावध होतील अशी मागणी होत आहे.