पारोळा:पारोळा पासून अवघ्या 19 की. मी. अंतरावर कोरोनाचे हॉटस्पॉट अमळनेर असून या गावाच्या सीमा पोलिसांनी बंदोबस्तात ठेवल्या असल्या तरी अजूनही काहीजण अमळनेर पारोळा असे ये जा करीत आहेत या दोन्ही गावाच्या सीमेवर ये जा करणाऱ्यांची कोरोना स्कंनिंग करावी अन्यथा पारोळा हे सुद्धा धोकेदायक बनेल असा काही जाणकारांचा अंदाज आहे.
अमळनेर शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून काही परिसर सील केला गेला आहे तरीही याच सील केलेल्या परिसरातूनच नवीन रुग्ण सापडत आहेत.अमळनेरच्या शेजारी पारोळा तालुका असून पोलिसांनी या दोन्ही शहराच्या सीमा सील केल्या असल्या तरीही काही जण विना कारणाने ये जा करीत आहेत अश्या ये जा करणाऱ्यांची कोरोना स्कंनिंग करावी अशी मागणी पारोळ्यातून पुढे येत आहे.

पारोळा रत्नापिपरी भिलाली फाटा जवळ रस्त्यावर लावलेले ब्यारॅकेट लावून पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत बंदोबस्त लावण्यात आला आहे तरी पाहिजे तसा काटेकोर बंदोबस्त व गांभीर्य घेतलेले दिसून येत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सक्तीच्या सूचना देणे गरजेचे आहे असे    पारोळ्यातील जाणकार लोकांनी मत व्यक्त केले आहे.