अमळनेर पारोळा रस्त्यावर भिलाली फाटा जवळ लावलेले ब्यारॅकेट हे लोखंडी असून त्यांना कोणतेही सावधनतेचे रेडियम अथवा स्टिकर लावलेले नाही त्यामुळे हे धोकादायक ठरले अशी चर्चा होत आहे.काही दिवसांपूर्वी चाळीसगांव हुन अमळनेरला बंदोबस्त साठी येणारा पोलीस कर्मचारी लावलेल्या त्या ब्यारॅकेटला रेडियम नसल्यामुळे थोडक्यात बचावले.असे लहान व किरकोळ स्वरूपाचे अपघात होतच होते तरी पोलीस विभागाने निदान या बॅरिकेट्सवर सावधानतेचा निशाण वा रेडियम लावने गरजेचे होते जेणेकरून वाहनधारक सावध झाले असते,अखेर पोलिसांच्या दिरंगाईमुळेच आज एकाला जीव गमवावा लागला अशी चर्चा दबक्या आवाजात जनते मध्ये होतांना दिसून येत आहे.


सविस्तर वृत्त असे की.....


दोन्ही तरूण दबापिंप्रीचे होते

रत्नापिंप्री ता.पारोळा रत्नापिंप्री - भिलाली फाट्यावर आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मोटारसायकल अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झालेल्यांची घटना घडली पारोळा-अमळनेर तालुक्यातील हद्दी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी पारोळा पोलिसांची चौकी देण्यात आली आहे या चौकीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे चौकी असल्याने येथे लोखंडी तुटलेल्या टावरचे बॅरीकेट हि लावण्यात आले आहेत आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दबापिंप्री येथिल दोन तरूण मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ ए.डब्लू. ४५४१ ने भरधाव वेगाने जात असताना चौकीवर लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरीकेटला जोरदार धडक दिल्याने भैय्या अभिमन भिल (वय ३४) हा जागीच ठार झाला तर संतोष नामदेव भिल ( वय ३६) हे गंभीर जखमी झालेल्यांची घटना घडली आहे जखमी संतोष भिल यांना खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले यावेळी दबापिंप्री, होळपिंप्री ,रत्नापिंप्री,सडावण येथिल तरूणांनी मदत केली यावेळी पारोळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर, आबा पाटील, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, होळपिंप्रीचे पोलिस पाटील गौतम भालेराव ,दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत, अमोल शिंदे, विजय भोई, राहुल पाटील मयुर पाटील शैलेश पाटील रामचंद्र पाटील किशोर वाघ शरद पाटील आदी उपस्थित होते या ठिकाणी हा दुसरा अपघात झाला आहे.
जीव गेल्या नंतर आता तरी झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग येईल का?अशी ग्रामस्थांन मध्ये चर्चा सुरू आहे.