अमळनेर:जळगाव जिल्ह्यात एकूण 114 कोरोनाबधित रुग्ण संख्या झाली असुन अमळनेरात रुग्ण संख्या वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाचे लोक आपला जीव धोक्यात घालून जनतेकरिता अहोरात्र झटत आहेत.
78 संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवालापैकी एकूण 64 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून 14 व्यक्तींचे कोरोना अहवाल पोसिटिव्ह आला आहे.हे पोसिटिव्ह असलेले रुग्ण हे अमळनेर शहरातील आहेत.अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
  आम्ही जीव व परिवार वाऱ्यावर सोडून लोकांकरिता लढत आहोत पण लोक साधे लॉक डाउन च्या नियमांचे पालन करू शकत नाही ही शोकांतिका आहे अशी खंत कोरोना विरुद्ध लढणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 'लोक न्युज"जवळ व्यक्त केली.