कोरोनाने”जगाला लढाईच आव्हान दीलं!अमळनेर शहर तालुक्यात त्याला रोखण्यासाठी सामान्यजनासह महसुल आधिकारी,पोलीस,डाॅक्टर्स अन सफाई कामगाराच्या फौजेसह  स्वतःला अक्षरशः युध्दात झोकुन दीलं!सकाळी ५=०० वा.अमळनेरकरांचा विश्वास सोबत घेऊन आत्मविश्वासाने कोरोना थोपवणेसाठी कृषीभूषण साहेबरावदादा  रोज कसाली-माळीवाडा पासुन ते तांबेपुरा बंगाली फाईल ढेकु रोड फवारणीने,दातृत्वाने,लोकांनां प्रोहत्सान देऊन गरीबांच्या,बेरोजगाराच्यां पोटाची खळगी भरणेसाठी पायात भिंगरी बांधुन तब्बल दोन महीन्यापासुन सामान्याच्या दारोदारी हिंडत आहे! १९ एप्रिल हा साहेबरावदादांचा वाढदीवस !वाढ दिवशी शुभेच्छा स्विकारण्याऐवजी चक्क स्वतः घंटागाडी-सफाईकामगारांनां प्रत्येकी १००० रुपयाची अनोखी भेट देऊन,सफाई कामगारांनां “कोरोनाच्या लढ्यासाठी प्रोहत्साहीत केले.

राजवड या खेड्यातुन येऊन अमळनेरकरांच्या संसारात रमणार्‍या या सेवाभावी दातृत्वाला वाढदीवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा!!

आण्णासो.रामभाऊ संदानशिव,अध्यक्ष,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परीषद,अमळनेर
जन.सेक्रेटरी,राष्ट्रीय नगरपालीका मजदुर महासंघ



    आण्णासो.रामभाऊ संदानशिव