अमळनेर: अमळनेर तालुक्यात जळोद येथे अवैधरित्या दारू विक्री पोलिसांना दिशाभूल करून होत असल्याने काहीच कारवाई होत नाही म्हणून गावाच्या कायदा व सुवस्था राखन्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटील यांनी सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांना सोबत घेत दारुसाठी लागणारे साहित्य नष्ट केले.
जळोद गावात अवैध दारू विक्री होते व त्यासाठी लोक गर्दी करतात व यावेळी सोसियल डीस्टेसिंग ही पाळले जात नाही म्हणून कोरोना आजार फैलु शकतो अशी तक्रार सरपंच जितेंद्र चौधरी यांनी पोलिसांना कळविले होती. मात्र खोट्या तक्रारी करतात असे म्हणून बिट हवलदार प्रभाकर पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली म्हणून काहीच कारवाई होत नाही हे बघून शेवटी जळोद गावाचे पोलीस पाटील ,सरपंच डॉ जितेंद्र चौधरी व ग्राम पंचायत सदस्य यांनी पुढे येत दारू साठी लागणारे सर्व साहित्य नष्ट केले आणि सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गर्दी केल्यास कोरोना कसा फैलु शकतो हे ग्रामस्थांना समजावून सांगितले.