अमळनेर:अमळनेर तालुक्यातील मुंगसे या गावाची महिला कोरोना पोजिटिव्ह निघाल्यामुळे सुमारे 4 गावे सील करण्यात आली आहेत.
अमळनेर तालुक्यातील एका 60 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पोजिटिव्ह आल्याने या कोरोना आजाराने अमळनेर तालुक्यात एन्ट्री केली असून प्रशासन अधिक कडक पाऊले उचलण्याच्या तयारीत आहे त्यानुसार मुंगसे परिसर,सावखेडा,रुंधाटी, दापोरी खुर्द व चोपडा येथील एक दवाखाना सील करण्यात आला आहे.
महिलेच्या संपर्कातील 10 लोकांना जळगावला कोरोंटाईन करणार असून मुंगसे या गावात 2 अम्बुलन्स दाखल झाले आहेत असे समजते.