पारोळा(प्रतिनिधी)
      मयुर पाटील

सविस्तर वृत्त असे कि पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा.मुंडे साहेब यांना प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी निवेदेन देऊन शासन निर्णयानुसार विविध योजनेचा लाभ दिव्यांगांना तत्काळ देण्यात यावा त्यात ५ % निधी , घरपट्टी व पाणीपट्टी ५० % सुट मिळावी, अंत्योदय योजनेचा लाभ ३५ किलो अन्न धान्य २ रू प्रति किलो प्रमाणे व विनाअट घरकुल योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी संघटनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील उपाध्यक्ष - पदमसिंग गिरासे , सचिव- ज्ञानेश्वर पाटील , सह सचिव- हेमंत महाजन, सल्लागार-दिलीप कोळी,तालुका रुग्णसेवक- महेश मोरे, सदस्य प्रकाश पाटील ,मझहर शेख, प्रमोद पाटील अल्त्ताफ शेख ,दीपक धनगर ,ज्ञानेश्वर बेलेकर ,सचिन पाटील ,व इतर दिव्यांग बांधव मोठ्या संकेने उपस्थिती होते तरी पारोळा शहरातील दिव्यांग बांधवांनी नगर परिषद मध्ये जाऊन नोंदणी करावी व योग्य योजनाचा लाभ घ्यावा अशी प्रहार अपंग क्रांती संघटना पारोळा चा वतीने आवाहन करणायत येत आहे.