
दि.13 मार्च 2020 रोजी ज.जि.प्रा.शि.पत.मर्या.जळगाव मु.का.पारोळा (पश्चिम सोसायटी) शाखा अमळनेर तर्फे संस्थेचे सभासद गुणवंत पाल्य व जि.प.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमळनेर तालुका केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष मा.आबासोा.श्री.गोकुळ आनंदा पाटील हे होते. या कार्यक्रमास विद्यमान चेअरमन मा.ताईसोा.श्रीम.भारती पाटील माजी चेअरमन दादासोा.श्री.राजेंद्र सोनवणे, केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक सोनवणे, श्री.यशवंत शिंदे, श्री.गोकुळ साळुंखे, श्री.अशोक इसे, श्री.राजेंद्र महाले, श्री.गोपाळ कोळी, श्री.प्रदिपसिंह राजपूत, श्री.गणेश बोढरे, श्री.अशोक ठाकूर, श्री.दत्तात्रय सोनवणे, श्री.अशोक पाटील, शाखाधिकारी श्री.पी.एन्.पाटील, श्री.भूषण सांगोळे, श्री.दिनेश पाटील, श्री.रामराव पाटील, चि.दर्शन सोनवणे इ.उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक श्री.अशोक रघुनाथ पाटील व गुणवंत पाल्य चि.गुंजन अशोक ठाकूर, चि.भावेश जगदिश चौधरी, चि.ऋत्विक अशोक इसे, चि.जयेश राजेंद्र महाले, चि.दर्शन दत्तात्रय सोनवणे, चि.प्रितम अशोक पाटील, चि.अनिरुध्द अशोक सोनवणे, कु.दिप्ती चंपालाल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.