शिरपूर(प्रतिनिधी) परराज्यतून शिरपूर मार्गे गुजरात कडे दारूने भरलेली आयशर गाडी जाणार असल्याची गोपीनय माहितीवरून शिरपूर शहर पोलीसांनी धडक कार्यवाही करीत अंदाजित ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करित तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
       हरियाणा येथुन दारूने भरलेला आयशर  क्रं. युपी २१ बीएन ३४७३ यातुन गुजरात कडे दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपीनय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहर पोलिसांनी शिरपूर शहादा रोडवरील वाघाडी गावाजवळ दि.११ मार्च रोजी सायंकाळ पासून सापळा रचला होता.सदर क्रमांकाची आयशर रात्री ११ वाजेच्या सुमारास वाघाडी गावाजवळ आली असता तिला थांबवून तपासणी केली.आयशर वाहनात ३८ लाख  ४० हजार रुपये किमतीची हिट नावाच्या ब्रँड असलेली दारूचे ८०० खोके प्रत्येकी १८० मिली ४८ बाटल्या असलेले खोके   मिळून आले. या कार्यवाहीत १० लाख किमतीची आयशर वाहनासहित एकूण ४८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन संशयित ताब्यात घेतले आहे.
         सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ,शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सागर आहेर,स्वप्नील बांगर,अमित रनमाळे,योगेश कोळी,ललित पाटील,तुकाराम गवळी, चालक हारून शेख आदींच्या पथकाने  केली
       याप्रकरणी पोकॉ स्वप्नील बांगर यांनी फिर्याद दिली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात  आयशर चालक मोहंमद अली मोहंमद (वय २२ रा.जमालगड ता.पुन्हाना जि. मेवात-हरियाणा) सहचालक  इस्माईल शहाबुद्दीन खान (वय १८ रा.सुवासिर्डी ता.तावडू जि.मेवात हरियाणा)विनोद पुंडलिक  जाधव (वय २६ रा.राणीमोहिदा ता.पानसेमल जि. मध्यप्रदेश) यांच्या विरोधात भाग ५,गुरनं ६४/२०२० मध्ये विविध कालमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.


सदर आयशर मध्ये रामा रोडवेज प्रा.ली.दिल्ली  ब्रँच ऑफिस जळगांव महाराष्ट्र   ट्रान्सपोर्ट च्या नावाने खोटी बिल्टटी तयार करून तीचेवर गव्हमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स केंटिंग स्टोअर्स डिपार्टमेंट यश डेपो अंबाला राज्य हरियाणा येथून नाशिक कॅटिंग राज्य महाराष्ट्र येथील कॅटिंग स्टोअर्सचा माल भरला असल्याचा खोटे कागदपत्रे तयार करून दारुची वाहतूक करण्यात येत होती.