अमळनेर(प्रतिनिधी)
व्रुक्षवल्ली महिला फाऊंडेशन संघटना तर्फे
 अ.शि.प्र.मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालय अमळनेर व साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर या शाळांना रयतेचा राजा छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. 
    तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हायरस हा आजार झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी मास्क प्रतिबंधक
वस्तुचे प्रात्यक्षिक करुन विद्यार्थ्यांना सौ.प्रेरणा पाटील यांनी मास्क भेट देऊन  मार्गदर्शन केले.अपेक्षा पवार यांनी गीत सादर केले. मुख्याध्यापक श्री.एस.डी.देशमुख व श्रीमती अनिता डी.बोरसे यांनी कोरोना व्हायरस होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी व या आजाराची लक्षणे कोणती या विषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
   या कार्यक्रमाला सौ.निलिमा सोनकुसरे,प्रेरणा पाटील, अपेक्षा पवार,योगिता पांडे,राजश्री पाटील,अर्चना आठवले,स्वाती भट उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.शितल सावंत मँडम यांनी केले.