अमळनेर: विदेशातून परत आलेल्या ए वन शूज च्या मालकाने आपण विदेशात गेलोच नाही असे सांगत कोरोना आजारविरुद्ध सज्ज असलेल्या प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून ए वन च्या चव्हाण दाम्पत्यविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना आजाराच्या धर्तीवर विदेशातून भारतात आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जाईल असे शासनाकडून वारंवार अपील करण्यात आले असले तरी अमळनेर चे ए वन शुज चे मालक अरविंद धनजी चव्हाण व त्यांच्या पत्नी हे विदेशातून परत आले पण त्यांनी विदेशात नाही तर पुण्यात गेलो होतो असे खोटे सांगितले पण अमळनेर च्या प्रांतअधिकारी सीमा अहिरे यांच्या ठाम माहितीने पुन्हा या चव्हाण दाम्पत्याची सखोल चौकशी केली असता हे विदेशातून परत आले आहेत ही खात्री पटल्याने अमळनेर पोलिसात अरविंद चव्हाण यांच्यावर साथ रोग अधिनियम 1897 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देशात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला असून अमळनेरात चिंतेचे वातावरण वाढत आहे.