धुळे(प्रतिनिधी)
Corona Virus या साथीच्या च्या पाश्वर्भूमीवर सामाजिक दायित्व म्हणून सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथिल डॉक्टर्स, नर्स, व सबंधित यंत्रणेसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आणि यशस्विनी सामाजिक अभियान व गोजराई सोसायटी फॉर नेचर अॅंड ह्युमॅनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा रुग्णालय येथे ३००० फेस मास्क व भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ६००० फेस मास्क चे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या जिल्हा समन्वयक सौ, ज्योती पावरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्री. माणिकराव सांगळे, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. नागसेन रामराजे, अधीक्षक डॉ. श्री. राजकुमार सूर्यवंशी, सुज्योत पावरा, जयेश अग्रवाल, पवन चौधरी, देवराज देवरे, रजत अग्रवाल, पंकज सोनार, योगेश सैंदाणे, सचिन अग्रवाल, आकाश पिनियर आदी उपस्थित होते.