दि. 17 रोजी शिरपूर तालुक्यातील चक्रीवादळामुळे पीकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची, तसेच वादळामुळे ज्या व्यक्ती बेघर झाल्याच त्यांची भेट घेतली. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त क्षेत्रातील या पाहणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. लिलाचंद लोणारी, अजंदेचे माजी सरपंच श्री. विलासअप्पा पाटील, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते श्री. परेश शिंपी उपस्थित होते. या पाहणीत सौ. ज्योती पावरा यांनी मांडळ, अजंदे, कळमसरे, करवंद आदी गावानां भेटी देऊन आपदग्रस्त शेतक-यांची विचारपूस केली व सर्वांना धीर देत विश्वास दिला, की आपल्या सर्व अपेक्षा, गरजा शासनस्तरावरून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा, तसेच पुनर्वसन, नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.