प्रतिनिधी अमळनेर
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील
यांची विधानसभा सभागृहाच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तालिका अध्यक्षीय पॅनलची घोषणा केली.
सदर पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने आमदार अनिल पाटील यांची निवड झाली आहे. अध्यक्ष अनुपस्थित असल्यास किंवा सभागृहातून काही कामानिमित्त बाहेर गेल्यास अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून अध्यक्षांची जबाबदारी पार पाडण्याचे काम या पदावर नियुक्ती झालेल्या आमदारांना असते.
आमदार अनिल भाईदास पाटील यांची निवड होताच अनेक चाहत्यांनी आमदार पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर सोबतच
या नियुक्ती संदर्भात बोलतांना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले विधानसभेमध्ये कामकाज सुरु असतांना अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्यावर तालिका अध्यक्षपदाची ही जबाबदारी येवून पडली आहे. ते काम आपण सक्षमपणे पार पडू असे देखील त्यांनी सांगितले.