रत्नापिंप्री ता.पारोळा (प्रतिनिधी)
सरकारी योजनांसाठी लढाई एकत्र लढावी जो पर्यंत दिव्यांग एकत्र येत नाहीत तो पर्यंत सर्व शासकीय योजना ह्या कागदावरच राहतील त्या चव्हाट्यावर आणण्यासाठी दिव्यांग बंधू भगिनींनी ही लढाई एकत्र येऊन लढावी तरच यश येईल असे आवाहन अॅड.कविता पवार यांनी पारोळा येथे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शाखेच्या उद्घघाटन प्रसंगी व पारोळा तालुका अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकारिणी निवड प्रसंगी केले.
यावेळी धुळे जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी , पारोळा अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल शिंपी , अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष रविंद्र पाटील , रुग्णसेवक महेश मोरे व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यकारिणीची निवड हि करण्यात आली यावेळी अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी जितेंद्र पाटील (रत्नापिंप्री), उपाध्यक्षपदी पद्मसिंग गिरासे , सचिवपदी ज्ञानेश्वर पाटील , सहसचिवपदी हेमंत महाजन , दिव्य सल्लागार दिलिप कोळी ,रूग्नसेवक महेश मोरे , सदस्य प्रमोद पाटील , मजहर शेख ,प्रकाश पाटील , अल्ताफ शेख , निसार खान , आदी अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.