राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने युवा सन्मान पुरस्काराचे वितरण
अमळनेर-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने युवा सन्मान पुरस्कारासाठी ज्या 12 पुरस्कारथीची निवड केली युवा पुरस्कारथी म्हणजे समाजासाठी विविध क्षेत्रातील आयकॉन असल्याची भावना आ.अनिल भाईदास पाटील यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात युवा सन्मान पुरस्काराचे वितरण केले जात असून त्याअनुषंगाने अमळनेर येथे देखील विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला,हा सोहळा जी एस हायस्कुल अमळनेर येथील आय एम ए हॉल मध्ये पार पडला.
यांना मिळाला पुरस्कार
राजकीय क्षेत्र-विक्रांत भास्कर पाटील(चेअरमन-देखरेख संघ)सौ प्रेरणा सुशील बोरसे,(लोकनियुक्त सरपंच-नगाव खुर्द ग्रा प)
सामाजिक क्षेत्र-सौ भारती पाटील(आधार बहुउद्देशीय संस्था),योगेश महाजन(परिश्रम मतिमंद विद्यालय,पारोळा)
उद्योग-जितेंद्र भवरीलाल कटारिया(वरद कॉम्प्युटर)
अश्विन जैन(महावीर ग्रुप)
कृषी-निलेश गोपीचंद धनगर
दीपक जगतराव बागुल,मंगरूळ
गोपाल बागुल
पत्रकारीता-किरण लक्ष्मण पाटील,चेतन देवसिंग राजपूत(दैनिक जनवास्तव),चंद्रकांत शांतीलाल पाटील(पत्रकार दिव्यमराठी)
क्रीडा-सायली किरण बडगुजर(खेळाडू)रेहान जाकीर शेख(खेळाडू)
सर्व पुरस्कार्थीना आ अनिल पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.