अमळनेर,-संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन (दिल्ली)द्वारा तत्कालीन सद्गुरु निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या 66 व्या जन्मजयंती निमित्ताने निरंकारी जगतात गुरुपूजा दिवस साजरा केला जाणार आहे. त्याअंतर्गत संपूर्ण भारत देशामध्ये 1166 पेक्षा अधिक सरकारी दवाखान्यांत महास्वच्छता अभियान संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन एकाच दिवशी राबवित आहे. विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वर्षा प्रमाणे ह्या वर्षी देखील संपूर्ण देशात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून हे ऐतिहासिक स्वच्छता अभियान धुळे झोन36 ब मध्ये *अमळनेर ब्रँच चे प्रमुख श्रीचंद निरांकरी जी * यांच्या नेतृत्वाखाली ** शासकीय रुग्णालयांमध्ये राबविले जात आहे.
दिनांक 23 फेब्रुवारी(रविवार) रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात सर्वत्र *महा स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण* करण्यात येणार आहे यावेळी *संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, सेवादल सदस्य व शेकडोंच्या संख्येने साध संगतचे सदस्य* उपस्थित राहणार आहेत.मंडळाच्या आदेशानुसार अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देखील या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वेळी *ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश ताडे, तसेच संत निरंकारी मंडळाच्या अमळनेर शाखे चे मुखी ,प्रचारक , तसेच सेवादल संचालक कैलास डिंगराई* यांच्या प्रमुख उपस्थितीत महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.तसेच संध्या. ५.३० ते ७ या वेळेत अमळनेर ब्रँच चे प्रमुख *श्रीचंद निरंकारी* (अमळनेर)यांच्या अध्यक्षतेखाली सत्संगाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी देखील सहभाग नोंदवावा असे आवाहन अमळनेर चे मुखी , प्रचारक, सेवादल तसेच सर्व साधसंगत यांच्या कडून करण्यात आले आहे.
------------------------------------------