अमळनेर । भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाची अवहेलना करत गद्दारी केली आहे उपेक्षित समाजाच्या विश्वासघात करणारा हा पक्ष असून बळ द्यायला धनगर वंजारी कुणबी तेली आणि माल घ्यायला मात्र दुसरेच अशी भाजपची कूटनीती आहे आता इट का जवाब पत्थर से देण्यासाठी हीच ती वेळ असून
अनिल भाईदास पाटील, कुणाल पाटील डॉ जितेंद्र ठाकूर तुषार शेळावे, संजय गरुड यांना धनगर वंजारी आणि इतर ओबीसी समाजाचे मतदान करावे असे आवाहन माजी आमदार तथा धुळे शहर मतदार संघाचे महा आघाडीचे पुरस्कृत उमेदवार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये महाराष्ट्रातील ओबीसींना केला आहे त्यांनी पुढे नमूद केले आहे की भाजपचे मंत्रीमंडळातील धनगर समाजाचे नेतृत्व महादेव जानकर यांचा अशरक्ष केसाने गळा कापला ॲडव्होकेट विजय मोरे यांचे जीवनच उध्वस्त केले तर गोपीचंद पडळकर या उगवत्या नेतृत्वाला बारामती मतदारसंघातून उमेदवारी देत बळी दिला आहे वास्तविक बारामती जिंकून दाखवण्याची वल्गना करणाऱ्या चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन पैकी एकाला उमेदवारी देणे अपेक्षित होते नाशिक मध्ये बाळासाहेब सानप या वंजारी समाजाचा नेत्यांच्याही विश्वास घात केला तेली समाजाचे सक्षम नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त केले हंसराज अहिर यांच्याशी दगलबाजी केले आपले लोक माता अहिल्याबाई आणि छत्रपती राजे यशवंतराव होळकर यांच्याशी रक्ताचे नाते असल्यानेच दगलबाजी केसाने गळा कापणाऱ्या विश्वासघात करणाऱ्या भाजपला म्हणूनच मी सोडचिट्टी दिल्याचे गोटेनी नमूद केले आहे
