अमळनेर  - प्रतिनिधी 

गेल्या पन्नास वर्षांत अमळनेर मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष शिरीष दादा चौधरी यांनी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढे राज्यात देखील केंद्राचाच विचाराचे सरकार सतारुढ होणार आहे,  यापुढे ही अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा सुरू रहावी असे वाटत असेल तर केवळ राज्यात येणारी भाजपाची सत्ता आणि या भूमीचा विकास हे दोनच मुद्दे डोळ्यासमोर ठेऊन महायुतीचे शिरीषदादा यांनाच पुन्हा निवडून आणा.जाती पातीच्या निरर्थक मुद्द्यांना हद्दपार करा असे आवाहन खासदार उन्मेश पाटील यांनी अमळनेर शहराच्या सभेत केले.    
             भाजप शिवसेना आर पी आय मित्रपक्ष  महायुतीचे उमेदवार आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या प्रचारार्थ  काल सायंकाळी सात वाजता भगवा चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेत्या अँड. ललिता पाटील, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रवींद्र चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सेनानी, माजी पोलीस सनदी अधिकारी साहेबराव पाटील, भाजप शहराध्यक्ष हरचद लांडगे, गटनेते प्रवीण पाठक, शाम पाटील, नगरसेवक सलीम टोपी, चाळीसगाव भाजप तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, सुनील भामरे,साहेबराव पवार,संजय पाटील, मनोज पाटील नगरसेवक विनोद पाटील, आर पी आय चे शाम सदांशिव, विक्रांत पाटील, राजू वर्मा,आदींसह मान्यवर उपस्थित होते.सभेला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.आपल्या भाषणात पुढे बोलताना खासदार पाटील म्हणाले की भाजपा पक्ष आज काळाची गरज बनली असून विकासाच ते माध्यम आहे,याव्यतिरिक्त कोणताही सक्षम पक्ष आता शिल्लक नसल्याने संपूर्ण देशाने स्वीकारले असून आता राज्यात देखील या निवडणुकीत तशीच परिस्थिती आहे,अमळनेर मतदारसंघ सत्तेच्या प्रवाहात ठेवायचा असेल तर आ.शिरीषदादांनाच आपले प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.



अँड. ललिता पाटील यांनी आपल्या भाषणात मागील निवडणूकित देखील मोदींजींची प्रचंड लाट असताना विरोधी उमेदवार अनिल पाटील हे भाजपाची उमेदवारी मिळून देखील निवडू शकले नाहीत,आता तर अजून बुडत्या जहाजात ते बसल्याने निवडून येणे अश्यक्य असून ग्रामीण भागात गावेच्या गावे महायुतीचे उमेदवार आ.शिरीष चौधरी यांना पाठिंबा देत आहेत,यामुळे तेच विजयी होतील आणि अनिल पाटील यांची पराभवाची मालिका कायम राहील असे भाकीत अँड पाटील यांनी व्यक्त केले.डॉ रविंद्र  चौधरीं यांनी गेल्या पाच वर्षात आमदार चौधरी यांनी कधीही जातीपातीचे धोरण न ठेवता सर्वसमावेशक विकास केला,भविष्यात देखील विकासाचे पर्व सुरू ठेवण्यासाठी जातीपातीच्या मुद्द्यांना मूठमाती देऊन विकासाला साथ द्या असें आवाहन केले.आ शिरीष चौधरींनी देखील विजयी करण्याचे आवाहन केले.
          यावेळी मंदार कुलकर्णी,अमोल माळी, विलास पवार, आनंद दुसाने, अनिल मांडोळे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.