प्रतिनिधी अमळनेर
तालुक्यातील शाश्वत विकासाला समृद्ध अशा पाडळसरे प्रकल्पावर तालुक्यातील नागरिक हा अन्याय विसरणार का व खोटी आश्वासने आणि खोटी पोस्टरबाजी करणाऱ्यांना धडा शिकवा व अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले आहे
तालुक्यातील असलेला पाडळसरे हा प्रकल्प 6 तालुक्यांना जीवनदायिनी प्रकल्प आहे.
आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाची उंची 5 मीटर ने वाढली आहे. हे काम तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले हे काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेस करू शकते.मात्र गेल्या पाच वर्षात कोट्यवधींची आश्वासनांचे जुमले बांधणारे कधी 200 कोटी कधी 1500 कोटी कधी जलआयोगाची परवानगी तर कधी पंतप्रधान कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना अशा थापा मारून पाच वर्षे काढून नेले पाच वर्षात 1 खडा सिमेंटचा देखील पडला नाही. पाच वर्षात 4 वर्ष या धरणासाठी दिलेली गाजरे पाहून जनता खुश होत होती. निधी मिळत नाही म्हणून आंदोलने झाली याकडे जिल्ह्यातील जलसंपदा मंत्र्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. आता मात्र निवडणुका आल्या पाडळसर्याचे 1500 कोटींचे गाजर नवीन दिले. पुन्हा पोस्टरबाजी झाली. मात्र त्यातील सत्य जेव्हा बाहेर आले. त्यामुळे शासनाचे गाजर उघडे पडले. सन 2018- 2019 च्या कालावधीत नाबार्डकडून निधी त्यावेळी मंजूर झालेल्या प्रकल्पांसाठी मिळालेला नाही. मग पाडळसरे धरण कोसो ददूर आहे. ते आता मंजूर झाले पण त्याला प्रक्रिया मोठी आहे ती होत होत त्याला तीनचार वर्ष निघून जाईल मग धरण अजून पाच वर्षे मागे पडेल नुसते गाजर दाखवून चुचकारण्याचे दिवस संपले आहेत. या शासनाने अमळनेर तालुक्यावर किती अन्याय केला आहे. हे जनतेने डोळ्यांनी पाहिले आहे विविध आंदोलनातून यासाठी संघर्ष केला. यावरून दिसते 6 तालुक्यांना पाणी सिंचन उद्योग या सर्व विकासाला मोठा ब्रेक या सरकारने दिला आहे.
अमळनेर तालुक्यातील माणसांवर प्रेम करणाऱ्या स्वप्नातील गावाच्या कार्यकर्त्यांनी निवडून द्यावयाच्या उमेदवाराबद्दल अधिक सखोल मूल्यमापन करायला हवे. आपले प्रश्न माहीत असताना, ते प्रश्न प्रभावीपणे योग्य ठिकाणी मांडू शकणे आणि विकासाची स्वत:ची दृष्टी असणारे उमेदवार कोण तर तो आपला भुमिपुत्र करू शकतो हेच मतदारांनी ठरवायला हवे.
मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात प्रामाणिक असणारा, समाजसेवेची आवड असणारा अभ्यासू उमेदवार लोकांनी निवडायला हवा, तरच सरकारने लोकांसाठी घोषित केलेल्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचू शकतील. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने अमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला जाब विचारण्याची क्षमता हवी.त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनाच विजयी करा असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.