प्रतिनिधी अमळनेर 
अमळनेर मतदारसंघातील जनता आता भूमिपुत्रासाठी एकजुटीने एकवटली आहे. गावागावातून आर्थिक मदतीचा हात वर्गणी गोळा करून देत आहे.



अमळनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रि.पा.ई(कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षांचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना मदतीचा हात देत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यातील शिरूड येथे शनिवारी अनिल भाईदास पाटील यांचा प्रचार दौरा सुरू होता.



त्यात शिरूड ग्रामस्थांनी एकजुटीने भूमीपुत्राला मदतीचा हात म्हणून एक पेटी तयार केली त्यात गावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली सोबत घरोघरी भेट देत असतांना स्वयंस्फूर्तीने नागरिक जमा होत होते. व पेटीत आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत करत होते. या एकजुटीमुळे उमेदवार अनिल भाईदास पाटील गहिवरून गेले. गेल्या पाच वर्षांपूर्वी राज्यभरात बिकानेरचा कलंक घेऊन फिरणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भूमीपुत्राला मदत देत आपला कलंक यंदा पुसून काढणारी ही बाब दाखवून देत आहे. यंदा धनलक्ष्मीने कितीही जोर केला तरी आम्ही न जुमानता स्थानिक उमेदवार कसा विजयी होईल याचा ध्यास घेतला आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.



तालुक्यातील अंतुर्ली व रंजाणे गावात देखील अशीच मदत गोळा करून देण्यात आली ठिकठिकाणी व त्यांनीही यावेळी भूमीपुत्राला साथ देण्याचा निर्धार केला आहे. राजकारण कुठेही जावो पण यंदा स्थानिक प्रश्नांसाठी स्थानिक पातळीवरील उमेदवारच हवा असा विश्वास अंतुर्ली येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष पाटील यांनी मदत गोळा करतांना व्यक्त केला आहे. अमळनेर तालुक्याचे राजकारण तालुक्यातील नेत्यांच्या हातून जात विशिष्ट शक्तींच्या हाती जात असल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी हे राजकारण जाऊ देणे अथवा न जाऊ देणे हे मतदारांच्या हाती आहे. आता त्यामुळेच जनता स्वतःहून आर्थिक मदत देत आहे. यामुळे यंदा धनलक्ष्मी नाकारण्यास सक्षम झाले आहे. प्रचार फेरी दरम्यान महिला औक्षण करतांना प्रचारात पायी चालून थकलेल्या अनिल पाटील यांना दुधाचा ग्लास भरवत आपला आशीर्वाद देखील देत आहेत.


त्यात गावोगावी प्रचारफेरीत स्थानिक उमेदवार ही पसंती ठरली आहे. या प्रचार फेरीत जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश ग्रंथालय सचिव रिटाताई बाविस्कर, रंजनाताई देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, मार्केट संचालक विजय पाटील (विजु आप्पा), एल.टी.नाना पाटील, डॉ रामलाल पाटील, हिम्मत पाटील, गौरव पाटील, मनोहर पाटील, हर्षल पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.