ग्रामिण भागात प्रचंड चर्चा,भूमिपुत्र म्हणून स्वीकारण्याची देताहेत ग्वाही
अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामिण भागात सुरू केलेला जनआशीर्वाद दौरा विशेष चर्चेत असून यास सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्यांने मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचे संकेत हा दौरा देत आहे.
दररोज किमान 10 ते 12 गावांच्या भेटी या दौऱ्याच्या माध्यमातून होत असून अनेक गावांत महिला भगिनी अनिल पाटलांचे औक्षण करून शुभ संकेत देत आहेत.
जवळपास अनेक गावांच्या भेटी या दौऱ्याच्या माध्यमातून झाल्या असून याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे,काल दि 4 रोजी पारोळा तालुक्यातील सुमठाणे,जिराली,इंधवे,वडगाव, पिंपळकोठा वसतनगर,भोलाने,जामदे,तसेच कुर्हे बु,कुर्हे खु,टाकरखेडा,औरंगपूर,म्हसले, कंडारी,लोणे,आदी गावात दौरे झाले,सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला,