अमळनेर :- भूमिपुत्र असल्याचा अविर्भाव करीत अमळनेर मतदार संघाविषयी उमाळे व्यक्त करणारे उमेदवार मागील 5 वर्ष राजकारणातून बाद झाल्यासारखे वागले आणि ठेकेदवारीचा मलिदा चाखण्यात मग्न राहिले आणि आता अचानक भूमिपुत्र असल्याचा अविर्भाव करीत भावनिक राजकारण करू पाहत आहेत. अशांना मतदार भीक घालणार नाही.
याऊलट अशा कोणत्याही गोष्टीवर टीकाटिपणी न करता सतत पाच वर्षे जनतेची खरोखर सेवा करीत ज्यांनी 1550 कोटी रुपयांपर्यंतचा विकास निधी या मतदारसंघासाठी ओढून आणला, त्या शिरीष चौधरी यांच्या पाठीशी जनता कालही ठामपणे उभी उभी होती आणि आजही उभी आहे; असा विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया गावागावातील कार्यकर्ते आणि मतदारांमधून ऊमटत आहेत.
आपणच भूमिपुत्र असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांबद्दल जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मतदार संघात आणखी चार-पाच उमेदवार स्थानिक असून ते भूमिपुत्र नाहीत का? असाही प्रश्न केला जात आहे. लोकांमधून देणग्या गोळा करून आपला उमेदवारीचा कंड शमवून घेणाऱ्या उमेदवाराबद्दल कडवट प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटल्या असून सत्ता दिल्ली तेव्हा काहीही करू न शकलेले हे भूमिपुत्र आता सत्तेबाहेर राहून कोणता विकासाचा पाऊस पडणार आहेत? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
देणग्या गोळा करण्याचा स्टंट करणाऱ्या या भूमिपुत्राने अमळनेर मतदारसंघाविषयी गेल्या पूर्ण पाच वर्षात काही कळवळा का दाखवला नाही? रखडलेल्या प्रश्नांवर आवाज का उठवला नाही? असा प्रश्न उपस्थित करताना ग्रामीण कार्यकर्ते म्हणाले की, वास्तविक अमळनेर मतदारसंघात अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते कोणामुळे प्रलंबित राहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी या भूमिपुत्रांनी यापूर्वी कधी काही केले आहे का? याची तपासणी करण्याची वेळ आज आली आहे. बंद अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजना, रखडलेला माळण पांझरा नदीजोड प्रकल्प, अपूर्ण क्रीडा संकुल या सह अनेक प्रलंबित कामाविषयी व अवैध धंद्याविषयी हे कोणीही बोलले नाही.
कधी पाठपुरावा करताना दिसले नाही. त्याविषयी कोणतीही चर्चा न करता आता फक्त भावनिक राजकारण करण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात ह्या प्रलंबित कामाविषयी कोणताही पाठपुरावा केला नाही वा त्याविषयी आवाज उठवला नाही. खरं तर अमळनेरच्या विकासाचे व्हिजन घेऊन कोणीही पुढे येत नाही हे अमळनेरकरांचेच दुर्दैव म्हणावे लागेल.
आज जे भावनिक राजकारण करत आहेत यांना नगरपालिकेत, जिल्हा बँकेत, जिल्हा परिषदेला तीन टर्म संधी मिळाली परंतु ठोस असं कोणतेही काम त्यांनी केले नाही.
लोकप्रतिनिधी म्हटला की त्याच्या कामाची धमक पाहिले जाते त्याच्या पाठीशी सत्ता आहे की नाही पाहिले जाते. केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात पण भाजपाचीच सत्ता येईल त्यामुळे विरोधी पक्षातल्या भुमिपुत्राला मत देऊन काय साध्य होणार? हे मतदार पूर्ण ओळखून आहेत. त्यामुळे भूमिपुत्र हा मुद्दा कुचकामी ठरणार आहे.