प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद;मतदारांचा कौल सत्तेकडे!
पारोळा (प्रतिनिधी)
एरंडोल,पारोळा,भडगाव मतदारसंघाचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार चिमणराव पाटील यांचा प्रचार मोंढाळे,पींप्री,टोळी,तरडी,पातरखेडे,भालगांव,धारागीर,नंदगाव या गावांपासून जोरात सुरु केला आहे.त्यांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेतले.
केंद्रात महायुतीचे सरकार,राज्यातही महायुतीचे सरकार बहूमताने येण्याचे संकेत आहेत,मग सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी व मतदार संघाच्या विकासासाठी प्रत्येक गावात चिमणराव पाटील यांच्या विजयासाठी मतदारांनीच कंबर कसली असून त्यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी मतदारांनीच निर्धार केला आहे,त्यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना,भाजप,रिपाई चे कार्यकर्ते,तरुण,तरुणी,विद्यार्थी,अबालवृद्ध यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रत्येक गावात त्यांचे फटाके फोडून व ढोल ताशेच्या गजराने स्वागत करुन,त्यांचे औक्षन करण्यात आले, प्रत्येक गावातील ग्रामदेवतांची व मंदिराची पूजा करून आशीर्वाद देत,जनतेशी संवाद करुन पुढे जात होते.यावेळी शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतूर पाटील,अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, पोपटराव चव्हाण,जिजाबराव पाटील, पं.स.माजी सभापती डॉ.सुभाष पाटील,जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने,रोहिदास पाटील,जितेंद्र पाटील,प.स.सदस्य भिडू जाधव भिकन महाजन,अरुण पाटील,राजेंद्र पाटील,सखाराम चौधरी,भरत पाटील,गणेश पाटील,दिलीप पाटील,किशोर पाटील,गणेश पाटील,प्रशांत पाटील,अनिल पाटील,महेश पाटील,धर्मराज पाटील,अर्जुन पाटील,डॉ.पी.के.पाटील,भैय्या पाटील,राजेंद्र पाटील व प्रत्येक गावातील शिवसेना,भाजप,रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार रॅलीत मोठया संख्येने उपस्थित होते.