अमळनेर (प्रतिनिधी)प्रा.मोनिका मुंदडा हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील  रहिवासी आहेत. मिसेस इंडिया अर्थ 2017- 18 या सौंदर्य स्पर्धेसाठी  नामांकन दाखल केले असून, नुकतीच त्याची निवडही झाली आहे. प्रा. मोनिका मुंदडा म्हणालेकि शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायाम व योगा करणे गरजेचे आहे. स्वत:मधील सुप्त शक्‍ती आपण ओळखल्यास जगात काहीही अशक्‍य नाही. अमळनेरसारख्या छोट्याशा शहरातून माझे नामांकन होणे ही बाब निश्‍चितच खानदेशवासियांसाठी भूषणावह आहे. दिल्ली येथे 6 ऑक्टोबरला होणार अंतिम स्पर्धा नेटीझन्सच्या पाठबळावरच मी ही स्पर्धा जिंकू शकणार आहे. यासाठी माझ्या फेसबुक पेजला जास्तीत जास्त नेटीझन्सने भेट देवून लाइक करून एक मत जरूर द्यावे ही आग्रही विनंती.