30 कोटींची ई-निविदा प्रकाशित,आ शिरीष चौधरीनीं व्यक्त केले आभार

अमळनेर(  प्रतिनिधी  ) धुळे अमळनेर चोपडा राज्यमार्गावरील रस्त्याची सुधारणा करून अमळनेर हद्दीत चोपडा रेल्वे गेटवर उड्डाण पुलाच्या बांधकामास आ शिरीष चौधरी यांनी मागील वर्षी मंजुरी मिळविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच या कामाची इ निविदा प्रकाशित केल्याने खऱ्या अर्थाने आता या प्रक्रियेस गती मिळाली असून आगामी दोन वर्षात या पुलाचे काम पूर्णत्वास येऊन वाहतुकदारांची मोठी समस्या सुटणार आहे
             दि 17 सप्टेंबर रोजी या कामाची निविदा अमळनेर बांधकाम विभागाने प्रसिद्दीस दिली आहे निविदेनुसार धुळे, अमळनेर, चोपडा रास्ता कि मी 60/00ते6300 (प्रत्यक्षात की. मी 61/800ते66/800 )राज्य मार्ग 15 ची सुधारणा  व रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करणे असे कामाचे स्वरूप असून या कामाची अंदाजित किंमत 29,43,03,638/-आहे व  काम करण्याचा कालावधी 24 महिने पावसळ्यासह आहे,हि निविदा 19 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत संकेतस्थळावर उपलब्द राहणार असून 11 ऑक्टोबर ला निविदा पूर्व बैठक होणार आहे तसेच 30 व 31 ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात येईल यानंतर टेंडर प्रोसेस होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे

*स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद--आ शिरीष चौधरी*

        या संदर्भात आ शिरीष चौधरी यांनी सांगितले की चोपड्या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलावर वाहतुकीची नेहमीची समस्या पाहून अमळनेरकराना दिलासा मिळण्यासाठी या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल व्हावा असे स्वप्न  आम्ही लहानपणापासून अमळगाव येथे आमच्या आजोळी जाताना पाहात होतो सुदैवाने येथील जनतेने आमदारकीचा आशीर्वाद दिल्याने हि स्वप्नपूर्ती करण्याची संधी मिळाली या कामासाठी सुरवातीपासून पाठपुरावा केला यासाठी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले अखेर केंद्रीय बांधकाम मंत्री ना नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील,ना गिरीश महाजन आदींच्या सहकार्याने या कामास मंजुरी मिळून आज ई निविदा देखील प्रसिद्ध झाली यामुळे आता अवघ्या दोन वर्षात हे काम पूर्ण होऊन स्वप्नपूर्ती होणार असल्याचे आ चौधरी यांनी सांगितले व अमळनेर मतदार संघाच्या वतीने ना गडकरी,मुंख्यमंत्री फडणवीस,चंद्रकांत पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले,.दरम्यान हा उड्डाणपूल अमळनेर तालुक्यास वरदान ठरणार आहे